स्वतंत्रता दिवस

             आज स्वतंत्रता दिवस. १९૪७ साली आपला देश स्वतंत्र झाला. दरवर्षी याचं celebration केलं जातं. झेंडावंदन, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. पण अलिकडच्या काही वर्षात स्वातंत्र्य दिवस celebrate करण्याचं नवीन फॅड दिसून येतं. सकाळी सकाळी मोठ्या आवाजात DJ लाऊन देशभक्ति गीते लावली जातात. मग दिवसभर तो भोंगा (सुरुवातीला जरी चांगलं वाटलं तरी काही वेळाने तो आवाज irritate होतो म्हणून) चालूच असतो. तेव्हा खरा प्रश्न पडतो आपण खरचं स्वतंत्र झालो आहोत का? जर झालो आहोत तर आपल्याला जबरदस्तीने मोठ्या आवाजात देशभक्ती गीते का ऐकवली जातात? दरवर्षी पडणार्या या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आज थोडासा प्रयत्न केला आहे. 

             आज “स्वतंत्रता” आणि “स्वैराचार” यात मोठी गफ़लत होताना दिसून येते. लोकांना वाटतं आपल्याला हवं ते करण्यासाठी आपण स्वतंत्र आहोत.अर्थातच प्रत्येक व्यक्तीला हवं ते करण्याच स्वातंत्र्य असायलाच हवं. त्यात काही गैर नाही.पण जेव्हा हवी ति गोष्ट वाट्टेल तशी सामाजिक , वैचारिक, भावनीक, नैतिक भान न ठेवता बेजबाबदार पद्धतीने केली जात असेल तर त्याला स्वातंत्र्य तर नक्कीच म्हणता नाही येणार. तो झाला स्वैराचार. तेव्हा जेव्हा आपण एखादी हवी असलेली गोष्ट सामाजिक , वैचारिक, भावनीक, नैतिक भान ठेवून जबाबदार पद्धतीने करण्यास “समर्थ” होऊ तेव्हा आपण खर्या अर्थाने स्वतंत्र होऊ. “स्वतंत्र होणे” म्हणजे ती काही एका झटक्यात घडणारी गोष्ट नाही. It’s a process n it takes time. उदाहरण द्यायचं झालं तर लोकांना “सवय” असते chocolate किंवा काहीही खाल्लं की wrapper रस्त्यावर , बागेत बसलो तेथे टाकून देण्याची. “भारत माझा देश आहे” हे ते सपशेल विसरून जातात. ही सवय इतकी अंगवऴणी पडलेली असते कि त्यांना जर विचारलं wrapper कोठे टाकला तर त्यांना आठवत देखील नाही. आता तुम्ही म्हणाल स्वातंत्र्याचा आणि याचा काय संबंध? तर संबंध आहे. १५ आॅगस्ट १९૪७ ला आपण इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झालो असलो तरी आपण आपल्या “सवयींच्या गुलामगिरीत” अजुनही जगत आहोत. आणि माझ्या मते हे सर्वात ‘घातक पारतंत्र्य’ आहे. यातून स्वतंत्र व्हायचं असेल तर आपल्याला स्वतःला क्रांतिकारक होण्याची गरज आहे. तुम्हाला वाटेल कि ” सवयींची गुलामगिरी” या शब्दापेक्षा “वाईट सवयींची गुलामगिरी” हा शब्द जास्त specific आहे. पण माझ्या मते सवय चांगली असो वा वाईट त्यांच्या गुलामगिरीत राहण्याइतके दुबळे तर आपण नक्कीच नाही आहोत. कारण जेव्हा एखादी चांगली वा वाईट सवय जडते तेव्हा ती गोष्ट बर्याचदा प्रतिक्षिप्त क्रियेसारखी आपल्याला कऴायच्या आत केली जाते. त्यापेक्षा ती alert राहून केली तर ते जास्त योग्य ठरेल.

             “भौतिक स्वातंत्र्या”मागे धावण्यापेक्षा “आंतरीक स्वातंत्र्य” मिऴवण्याचा प्रयत्न केला तर आपण भारतीय नक्कीच स्वतंत्र होऊ आणि त्या वेळी खर्या अर्थाने आपला “भारत” स्वतंत्र होईल असे मला वाटते. 

– श्रद्धा

दोस्त

दोस्त…जो हे हमारा पागलपनती मे साथीदार,

जो झेले हमारी हर बात बेकार से भी बेकार..

जो दे बात बात पे ग्यान,

रखे हमारा हर situation में ध्यान..

जिसकी जीत हमारी हार भुला दें,

जिसकी तकलीफ हमें अपनी लगें…

जो हमें रोते हुए हसा दें,

जिसकी यादें हसतें हसतें आखें नम कर दें..

जो दुर रहके भी होते हें दिल के करीब,

एक प्यारा सा रिश्ता जो होता हें सिर्फ किस्मतवालों को नसिब…

– श्रद्धा

धुके

        खुप दिवसांनी ते दोघे daily routine मधून थोडा change म्हणून फिरायला आले होते. ते दोघे गडाच्या कड्याच्या कोपर्यावर असलेल्या कठड्यावर उभे होते… एकांतात… पावसाळा असल्याने सगऴीकडे हिरवळ होती. शांत पण् बोचरं वारं वाहत होतं. ढग जणू त्यांच्या हातात हात घालून फेरफटका मारण्यासाठी खाली उतरले असावेत असे वाटत होते. ३-૪ फुटापलिकडचं काहीच दिसत नव्हत. दोघेही शांत होते. ती जणू तंद्री लागल्यासारखी एकटक दरीत बघत होती. तेवढ्यात त्याच्या बोलण्याने तिची तंद्री भंग पावली.

तो : आयुष्य या धुक्यासारखं झालय. काहीच कळत नाही काय होईल ते.

ती : काहीही झालं तरी चालत रहायचं, थांबायचं माञ अजिबात नाही. जसं जसं पुढे पुढे जाऊत तसं तसं रस्ता आपोआप दिसू लागेल.

तिचे हे उत्तर ऐकून त्याच्या मनाची चलबिचल शांत झाली व त्याने तिच्याकडे कौतुकाने पाहिले. त्याचे मन आता त्या धुक्याकडे अपेक्षेने पाहू लागले…त्याने तिच्या खांद्यावर हात टाकून प्रेमाने हलकेच जवळ केले, आणि म्हणाला,”तुझी साथ असेल तर नक्कीच”. 

तिने हलकेच हसून प्रतिसाद (प्रतिक्रीया नव्हे) दिला आणि डोके त्याच्या खांद्यावर टेकवले. तिच्या त्या अनपेक्षित सुंदर प्रेमऴ प्रतिसादामुळे त्याचे मन जणू फुलपाखरु झाले तिच्या साथीने बागडण्याचे स्वप्न रंगवू लागले….आणि त्या बोचर्या वार्यातही तिला अनामिक अशी ऊब जाणवू लागली…

– श्रद्धा

चारोळी_१

तुझी चाहुल वाढवी ह्र्‍दयाची स्पंदने,
तुझ्या अथांग डोऴ्यात माझे स्वतःला हरवणे.तुझी आठवण श्वासांना गंधाळे,                           मनाच्या अत्तरकुपीतुन प्रेमाचा सुगंध दरवळे.

– श्रद्धा 

छंद

भावना शब्दबद्ध करावी अशी अचानक लहर आली..

वहीची कोरी पाने चटकन भरुन गेली.. 

प्रत्येक गोष्टीत दिसतसे रंग आता आगळा.. 

शब्दांशी खेळण्याचा नवा छंद जडला..

– श्रद्धा

‘त्या’च्या मनातलं

तुझ्या स्पर्शाने वार्याचे धुंद होणे, श्वासाचा सुगंध होणे.

तुझ्या येण्याने सृष्टिचे स्तब्ध होणे, नजरेचे बद्ध होणे.

तुझ्या हसण्याने शब्दांचे गीत होणे, स्पंदनांचे संगीत होणे.

तुझ्या नसण्याने आठवणींचे मोरपीस होणे, हुंदक्यांचा शहारा होणे.

भेटीची तुझ्या ओढ होणे, क्षणांचे ते गोड होणे.

तुझ्या दिसण्याने स्वप्नांचे रंगीत होणे, रंगांचे गंधीत होणे.

तुझ्या असण्याने आयुष्याचे सुंदर होणे, प्रेमाचे निरंतर होणे.

मैत्रीचे प्रेम होणे, प्रेमात मैत्री होणे, तुझ्याविना आता जगणे नाही जगणे.

– श्रद्धा

पाऊस

पाऊस म्हणजे नुसता रिमझिम किंवा धो-धो किंवा ऋतुचं येणं जाणं नसतं

पाऊस म्हणजे साचलेल्या पाण्यात तरंगणार्या कागदी होड्या असतं,पाय दुखेपर्यंत तळ्यात मारलेल्या उड्या असतं.

पाऊस म्हणजे बेडकाचं डराव डराव असतं, वळवळणार्या पैशाचं (चॉकलेटी रंगाचा अळी वर्गातला किडा) हात लावताच गोल होणं असतं.

पाऊस म्हणजे लहानग्याचं खऴखळणारं हास्य असतं, प्रेयसीचं हळूच लाजणं असतं.

पाऊस म्हणजे कधी नुसताच बघणं असतं तर कधी चिंब होणं असतं.

पाऊस म्हणजे ढगांच्या हातात हात गुंफून वर वर जाणं असतं,वार्याच्या वेगासोबत स्वतःला झोकून देणं असतं.

पाऊस म्हणजे झाकोऴलेल्या नभाला आलेली सोनेरी किनार असतं ,स्वर्गाच्या उंबरठ्यावरील सप्तरंगी कमान असतं.

पाऊस म्हणजे मिटक्या मारत घेतलेला चहाचा फुरका असतं, गरमागरम कांदा भजीवर मारलेला ताव असतं.

पाऊस म्हणजे एका छत्रीत मारलेला फेरफटका असतं , तर कधी आठवणीतलं मोरपीस असतं.

पाऊस म्हणजे लगबगीनं आडोसा शोधणं असतं,मुद्दाम छत्री बाजुला ठेऊन भिजणं असतं.

पाऊस म्हणजे कोठेतरी छत्री विसरुन येणं असतं, मग कोणासोबत तरी त्यांची छत्री share करुन दोघांनी अर्धवट भिजणं असतं.

पाऊस म्हणजे स्लिपरने jeans वर उडणारा चिखल असतं,अंगावर पाणी उडवून जाणार्या गाडीवाल्याकडे रागाने बघणं असतं.

पाऊस म्हणजे मित्र-मैत्रिणींसोबत long drive ला जाणं असतं, bike वर मागे बसून हात पसरुन आकाशाला कवेत घेणं असतं. 

पाऊस म्हणजे morning walk ला सुट्टी आणि blanket ओढून मस्त साखरझोपेत असणं असतं.

पाऊस म्हणजे थंडीने कुडकुडणं असतं, मित्राने स्वतःचं काढून दिलेल ‘jacket’ असतं.

पाऊस म्हणजे खिडकीच्या काचेवर साठलेलं धुकं असतं अन् त्यावर बोटाने लिहीलेलं नाव असतं

पाऊस म्हणजे एकत्र येणं असतं,सृष्टीच्या सौंदर्याचं लेणं असतं.

पाऊस म्हणजे कोकीळेची तान असतं, Arijit चं romantic सं song असतं.

पाऊस म्हणजे रिमझिमत्या सुखसरी असतं, डोळ्यांतून बरसणारं दुःखही असतं.

पाऊस म्हणजे कोणाच्यातरी प्रेमात पडावसं वाटणं असतं, प्रियकराच्या (नसलेल्या) आठवणीत खुलणारं हास्य असतं.

पाऊस म्हणजे कवींचं नव्याने जन्म घेणं असतं, कोणाचीतरी ‘कवीता’ होणं असतं.

पाऊस म्हणजे खिडकीत बसुन बरसणार्या सरींना डोळ्यांनी पिऊन घेणं असत.

पाऊस म्हणजे सृष्टीचं सर्जन होणं असतं

पाऊस म्हणजे ‘एकटं’ होणं असतं.

पाऊस म्हणजे ‘दुकटं’ होणं असतं.

पाऊस म्हणजे ‘अनुभवणं’ असतं.

पाऊस म्हणजे निसर्गात हरवून जाऊन ‘स्वतःला सापडणं’ असतं.

– श्रद्धा